माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE TIPS- खास सायकलस्वारांसाठी

PUNE TO KANYAKUMRI CYCLE RIDE TIPS

अनुक्रमणिका [INDEX]

१ . माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी सायकल प्रवास) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – पूर्वतयारी
२. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – पहिला
३. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – दूसरा
४. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – तिसरा
५. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – चौथा
६.माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – पाचवा
७. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – सहावा
८. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – सातवा
९ . माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – आठवा
१०. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – नववा
११. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – दहावा
१२. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – अकरावा
१३. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – बारावा
१४. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – दिवस : – तेरावा
१५. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – परतीचा प्रवास
१६. माझा आत्मशोध (पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी) PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE TIPS- खास सायकलस्वारांसाठी

हि राईड कोण करू शकतो / शकतात? [CYCLE RIDE TIPS]

Cअश्या राईडसाठी काय तयारी करावी?

१. सायकल बाबतची तयारी

  • राईड ला निघण्यापूर्वी काही दिवस अगोदर सायकल ची पूर्ण सर्व्हिसिंग (सर्व्हिस) करून घ्यावी.
  • टायर खूपच चांगले असतील तर ठीक नाहीतर टायर बदलले तर उत्तम.
  • सोबत अधिकच्या ट्यूब, पावर ब्रेक असतील तर ब्रेक वड्या, पंक्चर किट
  • संपूर्ण टूल कीट (किमान एकाकडे तरी असावी), पुढचे व मागचे लाईट, पावर बँक, शक्य असल्यास अधिकचे स्पोक, चैन किंवा तिचा तुकडा.     

२. सायकलस्वराची तयारी

  1. अगोदर सेट असेलेले कपडे खासकरून शॉर्ट, बिब, ग्लोज, हेल्मेट इ. वापरणे चांगले शक्यतो नवीन कपडे, नवीन गोष्टी मोठ्या राईडसाठी वापरू नयेत कारण नवीन कपडे सेट व्हायला वेळ लागतो आणि मोठ्या राईडला जर कपडे व इतर गोष्टी सहज नसतील तर तुम्ही नेहमीप्रमाणे राईड करू शकणार नाहीत अन त्यात जर ते कपडे रुतायला लागले किंवा इतर गोष्टी घट्ट किंवा सैल झाल्या तर तुम्ही आनंदाने राईड करू शकणार नाहीत.
  2. राईड सुरु करण्याच्या अगोदर अति सराव किंवा प्रमाणापेक्षा आराम नको सहज सराव तुम्ही नेहमी चालवता तितका सराव सुरु ठेवावा.
  3. लांबचा प्रवास असल्याने सायकल जसी तुमच्यासाठी सेट आहे तशीच ठेवावी सायकलमध्ये बदल करू नयेत जसे की नवीन सिट टाकणे, सिट च्या स्थितीत बदल करणे, नवीन रेस्टबार टाकणे, हँडल वर खाली घेणे. काही बदल करायचे असतील तर मोठ्या राईडच्या अगोदरच करावे म्हंणजे त्या गोष्टी सेट झालेल्या असतील.       

३. इतर तयारी [CYCLE RIDE TIPS]

  1. सोबत न्यायचे सामान: जितके सामान कमी घेता येईल तितके कमी सामान सोबत घ्यावे. अधिकचे समान तुम्हाला सायकल चालवताना अधिक शक्ती खर्च करायला लावते. जर तुम्ही हॉटेल मध्ये थांबणार असाल तर एका बँगेत बसेल तेव्हडे अत्यावश्यक सामान घेऊन गेलात तर योग्य परंतू जर तुम्ही राहणे आणि जेवणे स्वतः करणार असाल तर मग तुम्हाला तसे सामानाचे व कापल्या जाणाऱ्या अंतराचे योग्य नियोजन करून जावे लागेल.   
  2. आरोग्य: लांब पल्ल्याच्या सायकल राईड मध्ये सायकल आणि रायडर दोघांच्याही आरोग्याची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. सायकलस्वाराला जास्त काळजी घ्यावी लागते. विशेषतः निर्जलीकरनाचा घोका सायकलस्वाराला जास्त असतो त्यासाठी भरपूर पाणी, द्रवपदार्थ पिणे, इलेक्ट्रोल, लिंबू पाणी इ. चा योग्य वापर करून निर्जलीकरनाला दूर ठेवणे गरजेचे आहे. पायात पेटके येऊ नये म्हणून काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. त्यात सायकलिंग सुरु करण्यापूर्वी, ब्रेकदरम्यान व्यवस्थित स्ट्रेचिंग करणे या गोष्टींचा समावेश करावा.  
  3. प्रवासाचे नियोजन : जिथे जाणारआहात तिथे जाण्यासाठी च्या रोड ची संपूर्ण माहिती काढावी, पर्यायी मार्ग, वाटेत येणारी ठिकाणे, संभाव्य राहण्याचे ठिकाणे, अडचणीच्या वेळेस मदत मिळण्याचे ठिकाणे. वाटेतली सायकलचे दुकाने इ सर्व बारीक सारीक माहिती घ्यावी.  

४. प्रवासादरम्यान काय काळजी घ्यावी? [CYCLE RIDE TIPS]

  1. मोठ्या सायकल प्रवासात कधीही एका विशिष्ठ टप्प्यावर आपली सर्व उर्जा लाऊन सायकल चालवू नये.
  2. ठराविक वेळेनंतर सक्तीचा पाणी ब्रेक जरूर घ्यावा.
  3. एकूण अंतराचा विचार न करता फक्त पुढे येणाऱ्या पाणी ब्रेक पर्यंतच्याच अंतरचा विचार करवा.
  4. आमुक दिवशी अमुक ठिकाणी पोचायचेच हा अट्टाहास करून शरीरावर अतिरिक्त ताण देऊन त्या ठिकाणी पोचायचेच असे करणे विशेषतः सुरुवातीच्या दिवसांत टाळावे.
  5. दुपारी उन आणि रात्री थंडी असे वातावरण मिळाल्यास दुपारी ऊन टाळण्यासाठी थोडी विश्रांती घ्यावी.    

५. इतर लक्षात घेण्यायोग्य ठळक बाबी [CYCLE RIDE TIPS]

  1. प्रवासाच्या नेहमी दोन, तीन समांतर योजना असाव्यात कारण एका दिवसाचे नियोजन कोलमडले तर सर्व नियोजन कोलमडते, त्यामुळे वेळेला दुसरी पर्यायी योजना कामी येते. आमच्या प्रवासात हि एक दिवस ५० किमी चे अंतर कमी पार केल्याने आम्हला मदुराई वरून न जाता दुसऱ्या पर्यायी मार्गाने जावे लागले आणि त्यावेळी त्या रस्त्याने जाण्याची योजना आम्हला ऐन वेळी करावी लागली आणि आम्हला त्यावेळी पुढे येणारे महत्वाचे ठिकाणे हि माहित नव्हते.
  2. बऱ्याच वेळा कितीही पाणी पिलो तरीहि नरडे कोरडे पडत राहते त्यात जर भार उन्हात इलेक्टोरल चे पाणी पिलो तर ओठ / गळा/ नरडे कोरडे पडण्याचे प्रमाण वाढते तेव्हा सोबत थोडे काळे मीठ ठेवले आणि अश्या वेळी त्याचा छोटा तुकडा तोंडात ठेऊन पाणी पिलो आणि तो खडा तसाच थोडा वेळ थोंडत ठेवला तर ओठ / गळा/ नरडे कोरडे पडण्याचे तसेच निर्जलीकरण दोन्हीप्रकारात पटकन फरक जाणवतो.
  3. शॉर्ट चे घर्षण होऊ नये किंवा कमी व्हावे म्हणून खोबरेल तेल किवा डायपर क्रीम उत्तम काम करते.
  4. प्रवासादरम्यान सायकलची चैन, गिअर साफ करायची वेळ आली तर द्रवरूप विम ने सायकल धुतली तर चैन, गिअर चांगले साफ होतात.   
  5. आवश्यक ते मेडिकल जवळ ठेवावे आम्ही हायवे ने जाणार असल्याने आम्ही कुठलेही मेडिकल जवळ बाळगले नव्हते.
  6. रात्रीच्या मुक्कामाचे किंवा इतर गोष्टींचे आगाऊ आरक्षण आम्ही केले नव्हते कारण मग ठरलेल्या ठिकाणी पोचण्याचे दडपण घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे काही किलोमीटर आधी जरी राहण्याचे ठिकाण शोधले तरी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी सहज मिळते हा आमचा अनुभव आहे.
  7. दूरच्या सायकल प्रवासात बरेच जन पेट्रोल पंपावर पाणी भरून घेण्यावर भर देतात परुंतू आम्हाला प्रवासात दुपारी खूप ऊन आणि रात्री कडक थंडी असे विरोधी वातावरण मिळाल्याने आम्ही काळजी म्हणून पाणी विकत घेणे पसंत केले होते. तुम्ही परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकता.   

६. पुणे ते रामेश्वरम ते कन्याकुमारी सायकल राईड साठी किती खर्च येतो? [CYCLE RIDE TIPS]

  1. आम्हाला साधारण दिवसाला प्रवासादरम्यान पाणी, नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण (शाकाहारी) यासाठी १००० ते १५०० रुपये दिवसाला दोघांत मिळून लागत असत.
  2. रात्रीच्या मुक्कामासाठी शहरपरत्वे रुपये ६०० ते १५०० पर्यंत खर्च येत असे.
  3. परतीचा रेल्वे प्रवास व सायकल लगेज खर्च (कन्याकुमारी ते पुणे) साधारणता रुपये २५०० पर्यंत खर्च येतो (३ टियर ए.सी. स्लीपर कोच साठी)
  4. एकत्रितपणे साधारणतः दर दिवसाला २००० रुपये इतका खर्च आम्हाला आला.     

७. कन्याकुमारीवरून सायकल रेल्वे ने परत आणण्याची प्रक्रिया कशी असते?

  1. ज्या दिवशी प्रवास करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी जेव्हडे लवकर होईल तेव्हडे लवकर रेल्वेस्टेशनला सुपूर्द करावी कारण तिथे हे काम करणारे फक्त दोन लोक आहेत आणि ते लोक तुम्हाला ऐन वेळी मिळतील याची खात्री नाही.
  2. प्रथम तिकीट खिडकी वर लगेज चे चलन मिळते ते घ्यावे.
  3. त्यानंतर तिथे जे दोन लोक लगेज ची नोंद / वजन करून चलन भरून देतात ते त्यांच्याकडून भरून घ्यावे. (चलन भरून झाले कि तो माणूस पैसे मागतो ५० ते १०० रुपये ते घेतात)
  4. सायकल पाहून ते तिथे बाजूला सायकल लावायला सांगतात तिथे सायकल लावावी सायकल चे इतर सर्व सामान काढून घ्यावे.
  5. तिकीट खिडकीवर भरलेले चलन सादर करावे, आणि त्यांनी सांगितलेली रक्कम तिथे भरावी. पैसे भरल्यावर चलनाच्या दोन प्रती तिथून घ्याव्यात.   
  6. सही शिक्क्यचे चलन पुन्हा ज्यांच्याकडून चलन भरून घेतले होते त्यांना द्यावे. ते चलनाची एक प्रत तुम्हाला देतील.
  7. नंतर सायकल वर एक स्टीकर लावले जाईल आणि तुम्हाला पाटी आण्याला ऐनवेळी सांगितले जाईल. पाटी तिथे स्टेशनवर असणाऱ्या दुकानावर मिळते (रुपये १०० ला एक पाटी मिळते) तीथून ती मिळवावी त्यावर तुमचे नाव, मोबाईल नंबर, कुठून ते कुठपर्यंत वाहतून होणार आहे त्याचा उल्लेख करावा लागतो.
  8. कन्याकुमारी ते पुणे हि गाडी सकाळी असल्याने रात्रभर आपल्या सायकली तिथल्या झाडाखाली तश्याच उभ्या कराव्या लागतात आणि कन्याकुमारीच्या रेल्वेस्थानकाला कुंपण नसल्याने येथे कुणीही येऊ शकते. त्यामुळे आम्ही सायकली निदान त्या झाडाला कुलूप लावून तरी ठेऊ द्या आम्ही सकाळी लवकर येऊन तुम्हाला सायकल डब्यात ठेवायला मदत करू अशी विनवणी केल्यावर त्यांनी आम्हला तेथील झाडाला कुलुपात सायकल ठेव्याला परवानगी दिली.
  9. सकाळी लवकर रेल्वे स्थानकात जाऊन आपल्या सायकल डब्यात व्यवस्थित ठेवली कि नाही याची काळजी हि आपण घ्यावी. आम्ही सकाळी लवकर गेलो आमच्या सायकली गाडी फलाटावर लागली तरीही तेथील जे दोन लोक हे काम करतात त्यांचा पत्ता तिथे नव्हता तेंव्हा आम्हीच आमच्या सायकली घेऊन गाडी निघायला १० मिनिटे बाकी असताना चलन घेऊन लगेजच्या डब्यात ठेवल्या आणि गाडी निघ्याला अवघे ५ मिनिटे बाकी असताना तेथील लोक तिथे आले. सायकल ठेऊन मग पळत जाऊन आम्हला आमच्या डब्यात बसावे लागले.
  10. पुण्यात पोचल्यावर सामान कक्षात चौकशी केल्यावर कळले कि तुमच्या सायकली अजून इकडे आल्या नाहीत तेंव्हा आम्ही पुन्हा ज्या फलाटावर गाडी लागली आहे तिथे जाऊन आमच्या सायकली डब्यातून हस्तगत करून त्या आम्ही स्वतः सामान कक्षात घेऊन गेलो तिथे चलन दाखवून आमच्या सायकली ताब्यात घेतल्या. इथे आम्हाला स्लीप साठी काही पैसे द्यावे लागले नाहीत.
CYCLE RIDE TIPS सायकल वर अशी पाटी लावली जाते