काल रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे आज सकाळी उठायला उशीर झाला होता रात्री कधीतरी आमचे मित्र वाराणशीवरून रेल्वेने आले होते आणि आमच्या शेजारच्या रुममध्ये ते थांबले होते. सकाळी उठलो आणि पाहतो तो काय लाईट गायब. गरम – गार काय पाणीच नव्हते. आम्ही हॉटेल वाल्याला विचारले तर कळले कि काहीतरी मोठा बिघाड झाला आहे आणि लाईट कधी […]
आजचा दिवस खऱ्या अर्थाने आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस होता आजच्या एका दिवसात आम्हाला २२० किमी अंतर पार करायचे होते. जणू कसोटी क्रिकेट च्या पाचव्या दिवशी शेवटच्या सत्रात शेवटच्या जोडीला गोलंदाजाला अनुकूल वातावरणात २२० रणाचे लक्ष्य पार करायचे असावे. खरे तर लांब पाल्याच्या सायकल सफरी ह्या कसोटी क्रिकेटप्रमाणेच असतात जसे क्रिकेट मध्ये तुम्हाला पीचवर दीर्घकाळ उभे राहण्याचे […]
आम्ही जेंव्हापासून हा प्रवास सुरू केला होता आम्ही कधीही पहाटे चार वाजता उठून आवरले नव्हते पण आज आमच्यासाठी खूप महत्वाचा दिवस होता इतके दिवस ज्याची योजना आम्ही आखली होती त्यातला पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे महाकुंभ च्या पवित्र पर्वात संगमावर स्नान करणे आणि आम्ही आमच्या योजनेनुसार ते पूर्ण केल्याचा आम्हाला खूपच आनंद होता. आम्ही चार वाजता […]
कालच्या थरारक प्रवासानंतर आम्ही आमची योजना स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार बदलून आता पुन्हा ४० किमी मागे जाऊन चित्रकुट वरून प्रयागराजला जाण्याऐवजी आम्ही आता थेट राजापूर मार्गे प्रयागराजला आज जाण्याचे ठरवले होते. रस्ता कुठे एकेरी तर कुठे दुहेरी आहे परंतु रोड चांगला आहे. आम्ही १७० किमी अंतर आज पार करणार होतो आणि लवकर पोचायचे असेल तर लवकर […]
काल आम्ही अनपेक्षितपने बागेश्वर धाम मध्ये पोचल्याने आम्ही आमची योजना थोडी बदलली आणि आज खजुराहो मध्ये किती वेळ जातो त्यावर पुढे चित्रकूट, अर्तरा, किंवा बांदा मध्ये जायचे तो निर्णय परिस्थितिनुसार घेउ असे ठरवून आम्ही थोडे निवांत झालो होतो. दिवसेंदिवस सकाळी उठणे आळसवाणे वाटत होते. थकून चूर- चूर झालेले शरीर अंथरुणावर पडले की पुन्हा पहाटे अविरत […]
आज आम्ही छतरपुर पर्यंत जायचे ठरवले होते. गेल्या दोन दिवसापासून चे वातावरण पाहता आज आम्हाला जास्त अंतर पार करण्याची शक्यता वाटत नव्हती. आम्ही आमच्या नियोजित वेळापत्रकानूसार किमान ३० ते ४० किलोमीटर मागे होतो. त्यामुळे आम्ही वाराणसीला जाण्याचा आमचा बेत जवळ जवळ रद्द करून आज आरामात छतरपुर पर्यंत जायचे ठरवले होते. सकाळी खूप दाट धुके आणि […]
आम्हाला काल रात्री थांबलेल्या हॉटेल मालकाने आम्हाला सांगितले होते की, सकाळी लवकर निघायची घाई करू नका कारण सकाळी यापेक्षाही ही गडद धुके, थंडी आणि अंधार असेल दिवसभर धुके असते इकडे, या रोडवर वाहने खूप जोरात वाहतूक करत असतात तेंव्हा तुम्ही बायपास पर्यंत चांगला उजेड पडल्यावर जा. तरीही आज झाशी च्या थोडे पुढे थांबलो तरच वाराणशीला […]
उज्जैन पेक्षा ही जास्त थंडी ब्यावरा मध्ये जाणवत होती त्यामुळे आजही आम्हाला उठायला आणि आवरायला जो व्हायचा तो उशीर झालाच. गोदामातून सायकली काढून प्रवासासाठी तयार करेपर्यंत सात वाजत आले होते. सात वाजले तरीही वातावरण पहाटेसारखेच होते. धुके आणि अंधार मिळून अजूनही पहाटेचे पाच वाजल्यासारखे वाटत होते. काल खूपच सहज प्रवास झाल्याने आम्ही आज निघायला उशीर […]
थंडी इतकी होती की अंथरुणातून बाहेर पडायचे फारच जिवावर आले होते. तुम्ही पहिले आवरा, तुम्ही पहिले आवरा मध्ये आम्हाला रूम सोडून बाहेर पडायला साडेपाच वाजून गेले होते. सर्व सोपस्कार करून सायकली सज्ज केल्या आणि आम्ही उज्जैन च्या गल्ली – बोळातून निघालो कि लगेच काही मीटरवर गरम – गरम पोहे, दूध पाहून आम्ही तिथेच नाश्ता करायचे […]
गेले तीन दिवस मी सुयोग सरांना तुम्ही घ्या आवरून मी पडतो थोडा वेळ म्हणत पाच – दहा मिनिटे लोळत पडायचो तो आज मात्र मी जरा दचकूनच जागा झालो. अंघोळी अगोदर पायाची चांगली मालीश केली. चांगले स्ट्रेचिंग करून मग आम्ही सायकली सज्ज करू लागलो. एकदम बरे वाटत असले तरी सुरुवातीचे काही किलोमीटर अगदी सहज सायकलिंग करायचे […]