कन्मीयाकुमारी ते पुणे परतीचा प्रवास
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE – RETURN JOURNEY
अनुक्रमणिका [INDEX]
PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE पूर्ण झाल्यावर आम्ही दुसरा पूर्ण दिवस आम्ही कन्याकुमारी फिरण्यासाठी राखीव ठेवला होता. तेव्हा दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर उठलो खरे परंतू काल रात्री पासून ढगाळ वातावरण असल्याने आज सकाळी सूर्योदय व्यवस्थित पाहता येईल याबाबत साशंकता होती तरीही आम्ही सकाळी धावत जाऊन सुर्योदयापूर्वी गर्दीत घुसून चांगली जागा पाहून पुर्वेच्या क्षितिजाकडे डोळे लाऊन बसलो. क्षितिजावर ढगांचा एक थर होतो तेंव्हा पाण्यातून लगेच सूर्याचा गोळा क्षितिजावरून वर येईल अशी परिस्थिती नव्हती. इतके दिवस आम्ही सूर्योदयाचे निरनिराळे रूपे कधी गर्द झाडीतून, कधी माळरानाच्या बांधावरून, कधी पवनचक्क्यांच्या गराड्यातून तर कधी काटेरी बनातून आम्ही सूर्योदय अनुभवले होते. आज आम्ही कन्याकुमारीचा सूर्योदय अनुभवणार होतो तथापि ढगाळ वातावणामुळे थोडा हिरमोड झाला आणि सूर्य कासराभर वर आल्यावर ढगांच्या वर येऊन त्याने आम्हाला दर्शन दिले.
थोडा वेळ तिथे घालवून आम्ही पुढे तेथील गांधी मेमोरिअल ला भेट दिली जिथे गांधीजींची रक्षा आहे. याच इमारतीच्या छतावरून आणि समोरील एकाच जागेवरून सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्हीही न्याहाळू शकतो.
त्यानंतर आम्ही फेरी घेऊन आम्ही विवेकानंद रॉक मेमोरियल स्थळी पोचलो या फेरी साठी बरीच गर्दी असते सकाळी आठ ते संध्याकाळी साडेचार पर्यंत या फेऱ्या चालू असतात. बऱ्याच वेळा लांब रांग असते आणि तिथे तिकीट खिडकीवर प्रतीव्यक्ती रुपये ७५ दर आहे तुम्हाला रांगेत थांबायचे नसेल तर तुम्ही ३०० रुपायचे तिकीट काढू शकतात.
त्यानंतर आम्ही फेरी घेऊन आम्ही विवेकानंद रॉक मेमोरियल स्थळी पोचलो या फेरी साठी बरीच गर्दी असते सकाळी आठ ते संध्याकाळी साडेचार पर्यंत या फेऱ्या चालू असतात. बऱ्याच वेळा लांब रांग असते आणि तिथे तिकीट खिडकीवर प्रतीव्यक्ती रुपये ७५ दर आहे तुम्हाला रांगेत थांबायचे नसेल तर तुम्ही ३०० रुपायचे तिकीट काढू शकतात.
त्यानंतर आम्ही फेरी घेऊन आम्ही विवेकानंद रॉक मेमोरियल स्थळी पोचलो या फेरी साठी बरीच गर्दी असते सकाळी आठ ते संध्याकाळी साडेचार पर्यंत या फेऱ्या चालू असतात. बऱ्याच वेळा लांब रांग असते आणि तिथे तिकीट खिडकीवर प्रतीव्यक्ती रुपये ७५ दर आहे तुम्हाला रांगेत थांबायचे नसेल तर तुम्ही ३०० रुपायचे तिकीट काढू शकतात.
थोडा वेळ थांबून फेरी आली की प्रत्येकाला जीवन रक्षक जाकेट दिले जाते ते घालून तुम्हाला फेरीत प्रवेश दिला जातो. काही वेळातच आपण विवेकानंद रॉक मेमोरियल येथे पोचतो त्या समुद्रातील बेटावर कन्याकुमारी देवीचे मंदिर व विवेकानंद मेमोरियल हॉल आहे तिथे स्वामींची भव्य मूर्ती आहे. तासाभरात तुम्ही इथे सर्व स्थळांना भेट देऊ शकता लगेच बाजूच्या बेटावर तिरुवल्लुवर पुतळा आहे परंतू तिथे सध्या नुतनिकरणाचे काम चालू असल्याने तिथे सध्या जाता येत नाही.
कन्याकुमारी रेल्वे स्थानकाजवळ मायापुरी वंडर वॅक्स संग्रहालय तिथे तुम्ही भेट देऊ शकता.
दुपारनंतरचा पूर्ण दिवस आमचा सायकल रेल्वे स्थानकात सादर करण्यात गेला सायकल रेल्वेस्थानकात सायकल व्यवस्थित लावून जेवण करून रूमवर पोचेपर्यंत दहा वाजले होते. सकाळी लवकर रेल्वे स्थानकात जायचे असल्याने आम्ही सकाळी लवकर उठलो व सर्व आवरून सायकल वरील सामान डोक्यावर घेऊन रेल्वेस्थानकात (स्थानक रूमपासून जवळ होते) पोचलो.
पहिले सायकल ची स्थिती पाहिली सर्व काही व्यवस्थित असल्याने हायसे वाटले. सकाळचा नाश्ता स्थानकातच घेतला थोड्या वेळाने गाडी फलाटावर लागली तरीही तिथे आमच्या सायकली लगेज बोगी मध्ये ठेवण्यासाठी कुणीही नव्हते तेंव्हा आम्हीच सायकली त्या बोगीपार्यंत नेल्या आणि आतमध्ये ठेवल्या आणि गाडी सुटण्याअगोदर काही मिनिटे अगोदर आमच्या जागेवर पोचलो.
प्रवासासाठी व आरामासाठी आम्ही बुक केलेली सीट योग्य होती पुढचे जवळ जवळ ३८ तासाचा प्रवास मजेत झाला. या प्रवासादरम्यान सुयोग सरांनी संपूर्ण प्रवास फेसबुक वर पोस्ट केला आणि याच प्रवासात पुस्तक लिहण्याचा विचार मनात पहिल्यांदा आला होता.
पुढे प्रवास संपून पुण्यात आल्यावर मित्रमंडळी व कुटुंबीय यांनी जोरदार स्वगत केले.
माझ्यासाठी हा केवळ एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आमुक किलोमीटर आमुक दिवसांत पार करणारा फक्त एक सायकल प्रवास कधीच नव्हता…!!
ती एक आराधना होती, या महायज्ञात स्वतः ला झोकून देऊन पारखून घेण्याची ती आहुती होती.
तुफान वाहणाऱ्या हायवे वर वावरणारी मुंगी ते विशाल महासागराशी हितगूज होते ते.
एकमेकांची भाषा न समजणाऱ्या माणसांच्या भावविश्वाचा ठाव घेणारा सुर होता तो.
दिवसाचा “मी हे करणारच” चा पुरुषी अहंकार, तर रात्रीच्या वेदणेच्या कुशीतले रुदन होते ते.
पहाटेचा धुक्याशी हळवा प्रणय, तर दुपारचा रनरणता संग्राम होता तो.
हिरव्यागार समृद्धतेचा कधी आहेर, तर कधी ओसाड माळरानाचा कोरडा ओरखडा होता तो.
विहंगम क्षणांचा श्रीमंत खजिना होता तर कधी भणंग भिकाऱ्याची फाटकी झोळी होता तो.
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःला शोधण्याची शोधमोहीम होती ती.
तसे पाहिले तर अशी मोहीम करणारे आम्ही काही पहिलेच नव्हतो अनेक सायकलस्वार अश्या किंवा या पेक्षाही लांब पल्ल्यांच्या मोहिमा करत असतात. वरकरणी पाहिले तर पुणे – रामेश्वरम – कन्याकुमारी हा सायकल प्रवास (PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE) सायकल चालवायचा सराव असणारा कोणीही सायकलपटू सहज करू शकेल.
सवाल आहे की मला या PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE सफारीतून काय मिळाले? या महत्वाकांक्षी मोहिमेचे फलित काय?
मी नेहमी म्हणत असतो सायकल आपल्याला जीवनाचे धडे देत असते. जीवनाची क्षणभांगुरता शिकविण्याबरोबर ती तुम्हाला तुमच्या जीवनध्येयापर्यंत पोचण्याचा विश्वासही देते. या प्रवासाने मला कमालीचा आत्मविश्वास दिला त्याचा परिणाम माझ्या एकूण व्यक्तिमत्वावर झालेला माझा मलाच जाणवत आहे. या संपूर्ण प्रवासानंतर पुण्यात रात्री उशिरा पोचूनही लगेच दुसऱ्या दिवशी कामावर हजर राहण्यात मला जराही थकवट वाटत नव्हती.
माझ्या मते सायकल प्रवास तुम्हाला सर्व घटकांशी म्हणजे रोड, सभोवतालचा परिसर, झाडी, शेती, आणि एकूणच सर्व परिसराशी तुमची जवळून ओळख करून देते आणि तुम्ही त्यांच्याप्रती हळू हळू संवेदनशील बनत जाता. तुम्ही निसर्गाच्या आणि एकूण समाजजीवानाच्या जवळ जाता आणि तुमच्या संवेदना त्यांच्याप्रती अनुकूल बनत जाते परिणामी तुम्ही जास्त संवेदनशील बनले जाता असे निदान माझे तरी मत आहे.
या PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE संपूर्ण प्रवासात आम्ही शारीरिक क्षमतेची तसीच आमच्या भक्कम मानसिकतेचीही परीक्षा दिली आणि या दोन्ही आघाड्यावर यशस्वी ठरून आमच्या मानसिकतेला कणखरतेचे एक मजबूत आवरण चढवले.
सलग तेरा दिवस सायकल चालवल्यामुळे शारीरिक क्षमतेतही फरक आम्हां दोघानाही जाणवत आहे. आगोदर मी १०० किंवा जास्त किलोमीटर च्या राईड वरून आलो बाकी दिवसभर दुसरे काही काम करावेसे वाटत नव्हते. आता मात्र सुट्टीच्या दिवशी शतकी राईड नंतर ही दिवसभर आठवडाभराची कामे करायला उर्जा राहते.
तुमच्या वावरात सकारात्मकता येते, स्वभावातील चिडचिड, उथळपणा कमी होऊन तम्ही थोडे स्थिर नक्कीच होता.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घरापासून मला दूर घेऊन जाऊन सायकल ने घराचे महत्व पतवून दिले. एका घरात असूनही आपापल्या स्क्रीन मध्ये व्यस्त असेलल्या या काळात स्वयंपाक घरात धुपणारी बायको दिसण्याऐवजी तिला पाहण्याची गरज आहे. या प्रवासवर्णनात मी उल्लेख केल्याप्रमाने एका मंतरलेल्या क्षणी मी उडत्या बगळ्यांचे निखळणारे पिसे आणि जवळून जाणाऱ्या गाडीवरल्या गृहिणीच्या हातावरील स्वयंपाक करतानाच्या झालेल्या खुणा पाहिल्याचे वर्णिले आहे तो प्रसंग मला माझ्या अर्धांगिनीच्या हातावरील संसाराच्या चटक्यांची नोंद घेण्याचे शिकवून गेला. माझ्या छोटीचे बोबडे “पप्पा” मला ऐकू येत होते पण आता मी ऐकायला आतुर होऊ लागलो आहे. आज माझी माणसे दिसण्याऐवजी मी त्यांना पाहण्यावर भर देत आहे.
एकूणच या PUNE TO KANYAKUMARI CYCLE RIDE सायकल सफरीने मला माझी खरी ओळख करून दिली आणि “माझा आत्मशोध” संपला असे म्हणायला हरकत नाही.
जर कधी या व्यावहारिक जगात मी हरवल्याची जाणीव झालीच तर सरळ मी त्याची मानगूट पकडून पुन्हा अश्या एखाद्या लांबच्या सायकल सफरीवर निघून जाईल अन नाही झाली तर माझी माझ्याशी मैत्री अजून घट्ट करण्यासाठी संधी मिळताच अश्या सफरीवर निघणारच हे मात्र नक्की.