चाकांवरचा कुंभ – माझे मनोगत : Pune to Ayodhya Cycle Ride

पुणे ते अयोध्या सायकल प्रवास करणारा मी कुणी एकमेव नाही याची पूर्ण जाणीव मला आहे, परंतु असा सायकल प्रवास करणाऱ्यापैकी मी ही एक आहे, ही बाब माझ्यासाठी नक्कीच अभिमानास्पद तर आहेच परंतु या पूर्ण प्रवासात आलेले अनुभव, भेटलेली माणसे, पालथा घातलेला परिसर, एक रोमहर्षक अनुभूती शब्दबद्ध करून केवळ वाचनप्रेमीच नाही तर लांब पल्ल्याच्या सायकल मोहिमा करू इच्छिणाऱ्या सायकलपटूंसाठी देखील प्रेरणादाई तसेच मार्गदर्शनपर ठरेल यात शंका नाही आणि म्हणून हा शब्दप्रपंच!

मागील वर्षी पुणे ते कन्याकुमारी असा १८०० पेक्षा जास्त किमी चा सायकल प्रवास केल्यानंतर कन्याकुमारीच्या सागरकिनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने आम्ही पुणे ते अयोध्या सायकल वारी ची पेरणी केली होती. श्री राम प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त साधत ही सायकल मोहीम पार पडायचे ठरले आणि त्याची पूर्तता ही आम्ही केली.

एक मोठी मोहीम यशस्वीरित्या पार पाडलेली असल्याने आता २००० पेक्षा जास्त अंतर आपण योग्य नियोजन केले तर आपण सहज पार करू शकू याचा आत्मविश्वास आम्हाला असल्याने आम्ही पुणे ते आयोध्या असे सरळ १५०० किमी जाण्यापेक्षा उज्जैन, झाशी, प्रयागराज, वाराणशी, आयोध्या असा २००० पेक्षा जास्त किलोमीटर चा प्रवास ठरवला.

या संपूर्ण प्रवासात आम्हाला वेगवेगळे प्रदेश, माणसे, परिसर अनुभवायला मिळाले. एकदम बदलणारे वातावरण व त्याच्याशी जुळवून घेऊन हा सायकल प्रवास पूर्ण करण्याच्या विलक्षण अनुभव पुस्तकरूपी उतरवून तो शब्दरूपी उपलब्ध करून द्यावा अश्या विचारांनी या पुस्तकाचा पाया घातला. 

आमच्या या पूर्ण मोहिमेचा आर्थिक भार उचलून आम्हाला भक्कम पाठिंबा देणारे आमचे लाडके आमदार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील याचे कोटी कोटी आभार! त्याचे पदाधिकारी डॉ. अनुराधा एडके व श्री. राज तांबोळी सर यांनी या मोहिमेची आखणी ते परत पुण्यात येईपर्यंत केलेले उत्कृष्ट नियोजन व पूर्ण प्रवासादरम्यान दिलेला पाठिंबा या साठी मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

हे शब्दपुष्प गुंफायला श्री सुयोग शहा व त्यांचे कुटुंबीय, माझे कुटुंबीय व मित्रपरिवार, सायकलस्वार परिवार व जाणत्या अजाणत्या स्वरुपात या शब्दसफारीसाठी मदत लाभली आहे त्या सर्वांचा मी मनस्वी आभारी आहे!

           – नारायण पवार

पुणे ते आयोध्या सायकल वारीच्या प्रवासाचा नकाशा

2 Replies to “चाकांवरचा कुंभ – माझे मनोगत : Pune to Ayodhya Cycle Ride”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

चाकांवरचा कुंभ – दिवस पहिला – पुणे ते सिन्नर (१८७ किमी ): Day 1: Pune to Ayodhya Cycle Ride

दिवसाची सुरुवात आयोध्येकडे निघायच्या एक दिवस अगोदर डॉ. एडके ताई यांनी आम्हाला सांगितले की दादा तुम्हाला निरोप देण्यासाठी येणार आहेत. कोथरूड मधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणापासून या वारी ची सुरुवात करायची आहे तसेच आम्हाला निरोप देण्यासाठी काही सायकलस्वार आळंदीपर्यंत येणार आहेत. परंतु दादा आम्हाला निरोप द्यायला येणार म्हणाल्यावर आमच्यावर एका अनामिक दडपणासोबत रोमहर्षता आली […]

pune to ayodhya cycle ride

चाकांवरचा कुंभ – दिवस चौथा – महेश्वर ते उज्जैन (१४५ किमी ): Day 4: Maheshwar to Ujjain Cycle Ride

गेले तीन दिवस मी सुयोग सरांना तुम्ही घ्या आवरून मी पडतो थोडा वेळ म्हणत पाच – दहा मिनिटे लोळत पडायचो तो आज मात्र मी जरा दचकूनच जागा झालो. अंघोळी अगोदर पायाची चांगली मालीश केली. चांगले स्ट्रेचिंग करून मग आम्ही सायकली सज्ज करू लागलो. एकदम बरे वाटत असले तरी सुरुवातीचे काही किलोमीटर अगदी सहज सायकलिंग करायचे […]

PUNE TO AYODHYA CYCLE RIDE

चाकांवरचा कुंभ – दिवस दुसरा – सिन्नर ते धुळे (१९० किमी): Day 2: Sinnar to Dhule Cycle Ride

दिवसाची सुरुवात अजून आम्ही २०० किलोमीटरही पार केले नव्हते आणि थंडी ने आपला पगडा घालायला सुरुवात केली होती. पहाटे गरम दुलईतून उठून सर्व समान अवरून पुन्हा प्रवासाला सुरुवात करणे जरा जिकरीचे वाटू लागले. आम्ही दोघेही एकमेकांना तुम्ही आवरा … तुम्ही आवरा करत पाच मिनिटे पडतो म्हणून अर्धा तास असाच गेला. दोघांनाही आवरून रुमच्या बाहेर पडायला […]