चाकांवरचा कुंभ – पूर्वतयारी: Pune to Ayodhya Cycle Ride

प्रवासाची पूर्वतयारी कशी केली?

तसे पहिले तर आम्हाला पुणे ते कन्याकुमारी या लांब पल्ल्याच्या सायकल प्रवासाचा अनुभव असल्याने पुणे ते अयोध्या सायकल वारीसाठी काय काय तयारी करायला पाहिजे याची चांगली जान आम्हाला होती.

खरे तर पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवासानेच पुणे ते अयोध्या सायकल प्रवासाची बीजे पेरली होती. त्यामुळे जून पासूनच आम्ही हळूहळू पुणे ते अयोध्या प्रवासाची तयारी करू लागलो. कन्याकुमारी प्रवासाने आमचा आत्मविश्वास दुणवलेला असल्याने आपण ही राईड सहज पूर्ण करू अशी आम्हाला खात्री होती तरीही आम्ही नोव्हेंबर पासून सायकल चालवायचा सराव वाढवला होता.

नोव्हेंबर – डिसेंबर मध्ये पुण्यातून काही सायकलस्वार अयोध्या वारी करून आले होते त्यांचे अनुभव व जाण्याचा मार्ग निश्चित करण्याचे ठरले. अगोदर १६०० किमी चा नागपूर मार्गे जाण्याचा विचार होता. परंतु नंतर तो मार्ग उज्जैन, झाशी, खजुराहो कडून प्रयागराज, वाराणशी आणि मग अयोध्या असा निश्चित झाला. त्यात ही रेल्वे गोरखपूर वरून असल्याने तो ही मार्ग यात जमा करून एकूण प्रवासाचे अंतर २१०० पर्यन्त वाढत गेले.

पुणे ते कन्याकुमारी या सायकल प्रवासादरम्यान ज्या चुका आमच्याकडून झाल्या होत्या त्या या प्रवासात टाळण्याचा निर्धार आम्ही केला होता. जसे की मागील प्रवासादरम्यान आम्ही आवश्यकते पेक्षा जास्त समान सायकल वर लादले होते. या वेळी आम्ही ते अगदी कमी करून एका छोट्या बॅग मध्ये बसेल एव्हडेच सामान सोबत घ्यायचे ठरले होते.

पुणे ते अयोध्या सायकल वारीसाठी प्रायोजकत्व

पुणे ते अयोध्या या वारीसाठी प्रायोजक मिळविण्यासाठी मी हातपाय मारायचे ठरवले होते. अनेक ठिकाणी विचारणा करून झाली होती. पन कुठे डाळ शिजेल असे दिसेना.

आम्ही बऱ्याच वेळा मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सायकल रॅली मध्ये सहभागी झालो होतो तेंव्हा त्याचे सायकलस्वारांबद्दलचे प्रेम आम्हाला माहीत होते तेंव्हा आम्ही त्यांच्या विविध कार्यक्रमाचे (सायकल रॅली) यांचे नियोजन करणाऱ्या डॉ. अनुराधा एडके ताई व श्री राज तांबोळी यांना भेटून शब्द टाकायचे ठरले त्याप्रमाणे आम्ही डॉ. अनुराधा एडके ताई यांना विनंती केली त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला परंतू  मधल्या काळात आमच्याकडून आढावा घ्यायचे राहून गेले आणि आम्ही स्वतयारीला लागलो. राईड ला निघायचे काही दिवस बाकी असताना ताईंचा आम्हाला फोन आला की तुम्ही भेटायल या विसरलात की काय? आणि आमच्या संपूर्ण प्रवासाची जबाबदारी दादांनी घेतल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. खरे तर नेते मंडळींचा शब्द म्हणजे फक्त देण्यापुरता असतो तो काही पळायचा नसतो अशी धारणा करून आम्ही हा विषय सोडून दिला होता. पण जेव्हा ताईंचा आम्हाला फोन आला आणि त्यांनी स्वतः या बाबतीत पुढाकार घेऊन आम्हाला प्रयोजकत्व बहाल केले गेल्याचे सांगितले तेंव्हा खरे तर आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता.  त्याचबरोबर काही नेते कितीही व्यस्त आणि व्यापात असले तरीही छोट्या गोष्टीबाबत ही दिलेला शब्द पाळायला विसरत नाहीत याची प्रचिती आम्हाला आली.

या मोहिमेचा आर्थिक भार मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी उचलल्याने आम्हाला एक नवी ऊर्जा मिळाली आता फक्त आम्हाला शारीरिक आणि मानसिक तयारीवर भर द्यायचा होता. वेळोवेळी अनुराधा ताईंनी आमच्या तयारीचा आढावा घेतला. आम्ही मोठ्या प्रवासासाठी त्या प्रवासाला समर्पित अशी जर्सी घेत असतो त्यास अनुसरून  अनुराधा ताईंनी जर्सी चे डिझाईन फायनल केले व जर्सी तयार झाल्यावर एक दिवस त्यांनी आम्हाला सांगितले की दादा जर्सी चे अनावरण करणार आहेत आज त्यांना भेटायला या एकामागून एक सुखद धक्के आम्हाला बसत होते. दादांनी त्यांच्या हस्ते पुणे ते अयोध्या सायकल वारी च्या जर्सी चे अनावरण अतिशय व्यस्त कार्यक्रम असतानाही केले. त्यानंतर ही  त्यांनी  वेळात वेळ काढून आम्हाला निरोप देण्यासाठीही आले हे सर्व पाहून आमचा राजकीय व्यक्तिमत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोण पार बदलून गेला.

सायकल आणि सोबत घ्यायचे सामान

जसजसी निघायची तारीख जवळ येत होती तयारीला ही वेग आला होता कोणते सामान घ्यायचे कोणते नाही याचा ऊहापोह करत आम्ही यादी कमीत कमी करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु कितीही सामान कमी केले तरीही एका बॅगेत बसेल एव्हडे सामान कमी करणे आम्हाला काही जमले नाही. शेवटी कन्याकुमारी प्रवासात घेतलेल्या पॅनियर बॅगा सोबत घ्यायचे ठरले आणि सोबत घ्यायचे सामान कमी तर नाही परंतु किंचित जास्तच झाले होते कारण मध्य आणि उत्तर प्रदेश मधील थंडीचा विचार करता रोड बाइक ची टूर बाइककेव्हाच झाली होती. 

या प्रवासाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आमच्या सायकली त्यांची स्थिति उत्तम ठेवणे क्रमप्राप्त होते. पुणे ते कन्याकुमारी प्रवासादरम्यान आमच्या सायकल ने एक एक वेळ पंचर होण्याशिवाय कसलाही त्रास दिला नव्हता तरीही त्यांची योग्य डागडुजी करणे क्रमप्राप्त होते. तेव्हा आम्ही दोन्ही सायकलची सर्विस करून घेतली तसेच नवीन टायर व ट्यूब ने सज्ज केली.

तरीही नेमके निघायच्या आदल्या दिवशी माझ्या अचानक लक्षात आले की आत्ताच बादलेले गियर कॅसेट थोडे हालत (शेक होत) आहे. लगेच बाणेर येथील D Byk Store मधून ते फिक्स करून घेतले तेही निघायच्या आदल्या दिवशी.    आम्ही पुणे – कन्याकुमारी प्रवासावेळी निरंजन आर्ट, धायरी यांच्याकडून जर्सी बनवून घेतली होती त्यांचेकडूनच पुणे ते आयोध्या वारीची जर्सी बनवून घेतली ज्याचे डिजाइन आमचे मित्र श्री सुयोग शहा यांनी केले होते.

सोबत काय काय सामान घेतले होते?

सोबत घेतलेल्या सामानाची यादी
१.शॉर्ट्स – २२४.हेल्मेट
२.जर्सी  – २२५.नेलकटर
३.टीशर्ट – २२६.स्वेटर
४.पॅन्ट – फिरणे साठी – १२७.कॅमेरा स्टिक
५.नाइट पॅन्ट शर्ट – १२८.ब्रश व पेस्ट
६.केबल्स२९.दोरी
७.फ्लेक्स३०.सायकल लॉक
८.सेलफोन३१.कॅमेरा
९.पंचर किट३२.पॉवर बँक
१०.ज्यादा ट्यूब -२३३.कॅश
११.सायकल लाइट३४.गॉगल्स
१२.स्टिकर बॅंडेज३५.सुक्का मेवा
१३.सन क्रिम लोकशन३६.चार्जेर – मोबाईल , बॅटरी
१४.औषधे३७.हेडफोन
१५.मसाज ऑइल३८.रेडियम रिफ्लेक्टर
१६.मॉइश्चराइसर३९.फलक
१७.टॉवेल४०.बॅग
१८.अंडरवेअर४१.फ्लॅग, बॅनर
१९.रुमाल४२.पाणी बॉटल्स
२०.शूज-सॉक्स४३.डेटा बॅकअप-साधने
२१.ग्लोज४४.चैन (एक्स्ट्रा)
२२.मास्क४५.पॉवर एक्स्टेंशन
२३.लेग स्लिव्हस४६हायड्रेशन 

A cyclist preparing for a journey from Pune to Ayodhya, sitting beside their equipped bicycle with various packed items laid out on the floor.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

Pune to ayodhya cycle ride

चाकांवरचा कुंभ-दिवस अकरावा-प्रयागराज ते वाराणशी (१२१ किमी): Day 11: Prayagraj to Varanasi Ride

आम्ही जेंव्हापासून हा प्रवास सुरू केला होता आम्ही कधीही पहाटे चार वाजता उठून आवरले नव्हते पण आज आमच्यासाठी खूप महत्वाचा दिवस होता इतके दिवस ज्याची योजना आम्ही आखली होती त्यातला पहिला महत्वाचा टप्पा म्हणजे महाकुंभ च्या पवित्र पर्वात संगमावर स्नान करणे आणि आम्ही आमच्या योजनेनुसार ते पूर्ण केल्याचा आम्हाला खूपच आनंद होता. आम्ही चार वाजता […]

PUNE TO AYODHYA CYCLE RIEDE

चाकांवरचा कुंभ – दिवस तिसरा – धुळे ते महेश्वर (१६२ किमी ): Day 3: Dhule to Maheshwar Cycle Ride

दिवसाची सुरुवात ठरल्याप्रमाणे सकाळी प्रवास सुरू करण्यापूर्वी राममंदिरात दर्शनासाठी जायचे असल्याने आम्ही साडेतीन – पावणेचार पासून आवरायला सुरुवात केली. आमची आंघोळ, दूध – पाणी होईपर्यंत पाटील सरांनी आमच्या सत्कारची तयारी केली श्री पाटील सरांच्या परिवाराने आमचा यथोचित सत्कार केला. काल संध्याकाळ पासून केलेल्या पाहुणचाराने आम्ही भारावून गेलो होतो. त्यांच्या परिसरातील श्री राम मंदिरात जाऊन आम्ही […]

A person stands in front of the intricate architectural structures of a temple complex, surrounded by tourists and lush greenery, on a misty day.

चाकांवरचा कुंभ-दिवस नववा-बागेश्वर धाम ते बांदा (१३१ किमी): Day 9: Bageshwar Dham to Banda Ride

काल आम्ही अनपेक्षितपने बागेश्वर धाम मध्ये पोचल्याने आम्ही आमची योजना थोडी बदलली आणि आज खजुराहो मध्ये किती वेळ जातो त्यावर पुढे चित्रकूट, अर्तरा, किंवा बांदा मध्ये जायचे तो निर्णय परिस्थितिनुसार घेउ असे ठरवून आम्ही थोडे निवांत झालो होतो. दिवसेंदिवस सकाळी उठणे आळसवाणे वाटत होते. थकून चूर- चूर झालेले शरीर अंथरुणावर पडले की पुन्हा पहाटे अविरत […]