चाकांवरचा कुंभ – माझे मनोगत : Pune to Ayodhya Cycle Ride

पुणे ते अयोध्या सायकल प्रवास करणारा मी कुणी एकमेव नाही याची पूर्ण जाणीव मला आहे, परंतु असा सायकल प्रवास करणाऱ्यापैकी मी ही एक आहे, ही बाब माझ्यासाठी नक्कीच अभिमानास्पद तर आहेच परंतु या पूर्ण प्रवासात आलेले अनुभव, भेटलेली माणसे, पालथा घातलेला परिसर, एक रोमहर्षक अनुभूती शब्दबद्ध करून केवळ वाचनप्रेमीच नाही तर लांब पल्ल्याच्या सायकल मोहिमा करू इच्छिणाऱ्या सायकलपटूंसाठी देखील प्रेरणादाई तसेच मार्गदर्शनपर ठरेल यात शंका नाही आणि म्हणून हा शब्दप्रपंच!

मागील वर्षी पुणे ते कन्याकुमारी असा १८०० पेक्षा जास्त किमी चा सायकल प्रवास केल्यानंतर कन्याकुमारीच्या सागरकिनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने आम्ही पुणे ते अयोध्या सायकल वारी ची पेरणी केली होती. श्री राम प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त साधत ही सायकल मोहीम पार पडायचे ठरले आणि त्याची पूर्तता ही आम्ही केली.

एक मोठी मोहीम यशस्वीरित्या पार पाडलेली असल्याने आता २००० पेक्षा जास्त अंतर आपण योग्य नियोजन केले तर आपण सहज पार करू शकू याचा आत्मविश्वास आम्हाला असल्याने आम्ही पुणे ते आयोध्या असे सरळ १५०० किमी जाण्यापेक्षा उज्जैन, झाशी, प्रयागराज, वाराणशी, आयोध्या असा २००० पेक्षा जास्त किलोमीटर चा प्रवास ठरवला.

या संपूर्ण प्रवासात आम्हाला वेगवेगळे प्रदेश, माणसे, परिसर अनुभवायला मिळाले. एकदम बदलणारे वातावरण व त्याच्याशी जुळवून घेऊन हा सायकल प्रवास पूर्ण करण्याच्या विलक्षण अनुभव पुस्तकरूपी उतरवून तो शब्दरूपी उपलब्ध करून द्यावा अश्या विचारांनी या पुस्तकाचा पाया घातला. 

आमच्या या पूर्ण मोहिमेचा आर्थिक भार उचलून आम्हाला भक्कम पाठिंबा देणारे आमचे लाडके आमदार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील याचे कोटी कोटी आभार! त्याचे पदाधिकारी डॉ. अनुराधा एडके व श्री. राज तांबोळी सर यांनी या मोहिमेची आखणी ते परत पुण्यात येईपर्यंत केलेले उत्कृष्ट नियोजन व पूर्ण प्रवासादरम्यान दिलेला पाठिंबा या साठी मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

हे शब्दपुष्प गुंफायला श्री सुयोग शहा व त्यांचे कुटुंबीय, माझे कुटुंबीय व मित्रपरिवार, सायकलस्वार परिवार व जाणत्या अजाणत्या स्वरुपात या शब्दसफारीसाठी मदत लाभली आहे त्या सर्वांचा मी मनस्वी आभारी आहे!

           – नारायण पवार

पुणे ते आयोध्या सायकल वारीच्या प्रवासाचा नकाशा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

PUNE TO AYODHYA CYCLE RIDE

चाकांवरचा कुंभ – दिवस दुसरा – सिन्नर ते धुळे (१९० किमी): Day 2: Sinnar to Dhule Cycle Ride

दिवसाची सुरुवात अजून आम्ही २०० किलोमीटरही पार केले नव्हते आणि थंडी ने आपला पगडा घालायला सुरुवात केली होती. पहाटे गरम दुलईतून उठून सर्व समान अवरून पुन्हा प्रवासाला सुरुवात करणे जरा जिकरीचे वाटू लागले. आम्ही दोघेही एकमेकांना तुम्ही आवरा … तुम्ही आवरा करत पाच मिनिटे पडतो म्हणून अर्धा तास असाच गेला. दोघांनाही आवरून रुमच्या बाहेर पडायला […]

Pune to ayodhya cycle ride

चाकांवरचा कुंभ-दिवस बारावा-वाराणशी ते अयोध्या (२२० किमी): Day 12: Varanasi to Ayodhya Ride

आजचा दिवस खऱ्या अर्थाने आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस होता आजच्या एका दिवसात आम्हाला २२० किमी अंतर पार करायचे होते. जणू कसोटी क्रिकेट च्या पाचव्या दिवशी शेवटच्या सत्रात शेवटच्या जोडीला गोलंदाजाला अनुकूल वातावरणात २२० रणाचे लक्ष्य पार करायचे असावे. खरे तर लांब पाल्याच्या सायकल सफरी ह्या कसोटी क्रिकेटप्रमाणेच असतात जसे क्रिकेट मध्ये तुम्हाला पीचवर दीर्घकाळ उभे राहण्याचे […]

A person standing next to a stone monument featuring a carving of a horse rider with a sword, inscribed with text in Hindi, against a backdrop of a stone wall and misty weather.

चाकांवरचा कुंभ-दिवस सातवा-लुकवासा ते झाशी (१४२ किमी): Day 7: Lukwasa to Jhansi Ride

आम्हाला काल रात्री थांबलेल्या हॉटेल मालकाने आम्हाला सांगितले होते की, सकाळी लवकर निघायची घाई करू नका कारण सकाळी यापेक्षाही ही गडद धुके, थंडी आणि अंधार असेल दिवसभर धुके असते इकडे, या रोडवर वाहने खूप जोरात वाहतूक करत असतात तेंव्हा तुम्ही बायपास पर्यंत चांगला उजेड पडल्यावर जा. तरीही आज झाशी च्या थोडे पुढे थांबलो तरच वाराणशीला […]