चाकांवरचा कुंभ – माझे मनोगत : Pune to Ayodhya Cycle Ride

पुणे ते अयोध्या सायकल प्रवास करणारा मी कुणी एकमेव नाही याची पूर्ण जाणीव मला आहे, परंतु असा सायकल प्रवास करणाऱ्यापैकी मी ही एक आहे, ही बाब माझ्यासाठी नक्कीच अभिमानास्पद तर आहेच परंतु या पूर्ण प्रवासात आलेले अनुभव, भेटलेली माणसे, पालथा घातलेला परिसर, एक रोमहर्षक अनुभूती शब्दबद्ध करून केवळ वाचनप्रेमीच नाही तर लांब पल्ल्याच्या सायकल मोहिमा करू इच्छिणाऱ्या सायकलपटूंसाठी देखील प्रेरणादाई तसेच मार्गदर्शनपर ठरेल यात शंका नाही आणि म्हणून हा शब्दप्रपंच!

मागील वर्षी पुणे ते कन्याकुमारी असा १८०० पेक्षा जास्त किमी चा सायकल प्रवास केल्यानंतर कन्याकुमारीच्या सागरकिनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने आम्ही पुणे ते अयोध्या सायकल वारी ची पेरणी केली होती. श्री राम प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त साधत ही सायकल मोहीम पार पडायचे ठरले आणि त्याची पूर्तता ही आम्ही केली.

एक मोठी मोहीम यशस्वीरित्या पार पाडलेली असल्याने आता २००० पेक्षा जास्त अंतर आपण योग्य नियोजन केले तर आपण सहज पार करू शकू याचा आत्मविश्वास आम्हाला असल्याने आम्ही पुणे ते आयोध्या असे सरळ १५०० किमी जाण्यापेक्षा उज्जैन, झाशी, प्रयागराज, वाराणशी, आयोध्या असा २००० पेक्षा जास्त किलोमीटर चा प्रवास ठरवला.

या संपूर्ण प्रवासात आम्हाला वेगवेगळे प्रदेश, माणसे, परिसर अनुभवायला मिळाले. एकदम बदलणारे वातावरण व त्याच्याशी जुळवून घेऊन हा सायकल प्रवास पूर्ण करण्याच्या विलक्षण अनुभव पुस्तकरूपी उतरवून तो शब्दरूपी उपलब्ध करून द्यावा अश्या विचारांनी या पुस्तकाचा पाया घातला. 

आमच्या या पूर्ण मोहिमेचा आर्थिक भार उचलून आम्हाला भक्कम पाठिंबा देणारे आमचे लाडके आमदार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील याचे कोटी कोटी आभार! त्याचे पदाधिकारी डॉ. अनुराधा एडके व श्री. राज तांबोळी सर यांनी या मोहिमेची आखणी ते परत पुण्यात येईपर्यंत केलेले उत्कृष्ट नियोजन व पूर्ण प्रवासादरम्यान दिलेला पाठिंबा या साठी मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

हे शब्दपुष्प गुंफायला श्री सुयोग शहा व त्यांचे कुटुंबीय, माझे कुटुंबीय व मित्रपरिवार, सायकलस्वार परिवार व जाणत्या अजाणत्या स्वरुपात या शब्दसफारीसाठी मदत लाभली आहे त्या सर्वांचा मी मनस्वी आभारी आहे!

           – नारायण पवार

पुणे ते आयोध्या सायकल वारीच्या प्रवासाचा नकाशा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

एक मंदिराची दृश्ये ज्यामध्ये दिवे, ध्वज आणि सजावटीचे घटक आहेत, रात्रीचा प्रकाश आणि जिवंत रंग यांच्यामध्ये.

चाकांवरचा कुंभ-दिवस आठवा-झाशी ते बागेश्वर धाम (१६० किमी): Day 8: Jhansi to Bageshwar Dham Ride

आज आम्ही छतरपुर पर्यंत जायचे ठरवले होते. गेल्या दोन दिवसापासून चे वातावरण पाहता आज आम्हाला जास्त अंतर पार करण्याची शक्यता वाटत नव्हती. आम्ही आमच्या नियोजित वेळापत्रकानूसार किमान ३० ते ४० किलोमीटर मागे होतो. त्यामुळे आम्ही वाराणसीला जाण्याचा आमचा बेत जवळ जवळ रद्द करून आज आरामात छतरपुर पर्यंत जायचे ठरवले होते. सकाळी खूप दाट धुके आणि […]

pune to ayodhya cycle ride

चाकांवरचा कुंभ-दिवस तेरावा-श्री राम दर्शन आणि परतीचा प्रवास: Day 13: Shri Ram Darshan & Return Journey

काल रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे आज सकाळी उठायला उशीर झाला होता रात्री कधीतरी आमचे मित्र वाराणशीवरून रेल्वेने आले होते आणि आमच्या शेजारच्या रुममध्ये ते थांबले होते. सकाळी उठलो आणि पाहतो तो काय लाईट गायब. गरम – गार काय पाणीच नव्हते. आम्ही हॉटेल वाल्याला विचारले तर कळले कि काहीतरी मोठा बिघाड झाला आहे आणि लाईट कधी […]

चाकांवरचा कुंभ – दिवस पहिला – पुणे ते सिन्नर (१८७ किमी ): Day 1: Pune to Ayodhya Cycle Ride

दिवसाची सुरुवात आयोध्येकडे निघायच्या एक दिवस अगोदर डॉ. एडके ताई यांनी आम्हाला सांगितले की दादा तुम्हाला निरोप देण्यासाठी येणार आहेत. कोथरूड मधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणापासून या वारी ची सुरुवात करायची आहे तसेच आम्हाला निरोप देण्यासाठी काही सायकलस्वार आळंदीपर्यंत येणार आहेत. परंतु दादा आम्हाला निरोप द्यायला येणार म्हणाल्यावर आमच्यावर एका अनामिक दडपणासोबत रोमहर्षता आली […]