चाकांवरचा कुंभ

चाकांवरचा कुंभ-दिवस बारावा-वाराणशी ते अयोध्या (२२० किमी): Day 12: Varanasi to Ayodhya Ride

जचा दिवस खऱ्या अर्थाने आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस होता आजच्या एका दिवसात आम्हाला २२० किमी अंतर पार करायचे होते. जणू कसोटी क्रिकेट च्या पाचव्या दिवशी शेवटच्या सत्रात शेवटच्या जोडीला गोलंदाजाला अनुकूल वातावरणात २२० रणाचे लक्ष्य पार करायचे असावे.

खरे तर लांब पाल्याच्या सायकल सफरी ह्या कसोटी क्रिकेटप्रमाणेच असतात जसे क्रिकेट मध्ये तुम्हाला पीचवर दीर्घकाळ उभे राहण्याचे धैर्य दाखवावे लागते ज्याने रण आपोआप निघत जातात तसे लांब पल्ल्याच्या सायकल प्रवासातहि दीर्घकाळ सायकलवर बसण्याचे धैर्य ठेवावे लागते मग किलोमीटर आपोआप गणले जातात.

आम्ही पहाटे चार वाजता उठून आवरायला लागलो आज टंगळ मंगळ करून चालणार नव्हते. आजचा दिवस आमच्या स्वप्नपूर्तीचा दिवस होता आम्ही सुपररोमांचित होतो. राखून ठेवलेली सारी शक्ती आज आम्ही लाऊन २२० किमी चे दिव्य पार करण्याच्या आव्हानाचा सामना मोठ्या जिद्दीने करणार होतो.

साडेपाच च्या सुमारास आम्ही आमचा प्रवास सुरु केला धुके आजही होते पण खूप जास्त नव्हते दूरपर्यंत रोडवरील लाईट मध्ये उजळलेला रस्ता खूपच सुस्त होता. वाहतूक नसल्यात जमा होती. लवकरच आम्ही शहर सोडून बाजूच्या रोडने पुढे जाऊ लागलो आज चढाई खूप नसली तरीही उड्डाणपूल चढणे उतरणे आणि उलट्या वाऱ्याचा त्रास गृहीत धरून आम्ही सुर्योदयापर्यंत जास्तीत जास्त अंतर पार करण्याची योजना आखून चालत होतो. आता कोणतीही शक्ती राखून ठेवायची नव्हती तर आता राखून ठेवलेली ताकत वापरायची वेळ होती.

मोठ्या अंतराचा दबाव न घेता आम्ही २० – २० किलोमीटर चे टप्पे केले होते प्रत्येक टप्प्यावर आम्ही पाणी पीत कहीतरी खात आणि मग पुढे जात आम्ही एका वेळी फक्त पुढच्या २० किलोमीटरचाच चिचार करत पुढे जात होतो.

सव्वा सहाच्या सुमारस्त पहिल्या १८-२० किलोमीटर च्या टप्प्यावर आम्ही दुध – बिस्कीट खाऊन पुढच्या टप्प्याकडे निघालो. दुपारपर्यंत पाय सांभाळून व दुपारनंतर पाय मोडले तरी थांबायचे नाही असे ठरवून आम्ही पुढे निघालो होतो.  

हळू हळू अंधार आणी धुके निवळू लागले होते. दुपारी उन पडले तर उन्हाचा त्रास होऊ शकतो हे गृहीत धरून आम्ही दुपारी जर उन वाढले तर मग १५ -१५ किमी चे टप्पे करायचे असे ठरवून भारुपूर पाणी पीत वेग पकडत होतो. आज आपणा अयोध्येत पोचणार या विचारानेच अंगावर शहारे यायचे आणि आपसूकच पाय वेगाने फिरले जायचे.   

सिमेंटचा रोड आला की सायकल चालवायला कठीण जायचे कारण रोडवरील आडव्या रेषा ज्या चांगल्या ग्रीप साठी केलेल्या आहेत त्यावर सायकल विशेषतः आमच्या रोड बाइक त्यात अडकत जात असल्याने आम्हाला हवा तो वेग मिळत नव्हता त्यात आता उलटे वारे ही आमच्या संकटात भर टाकत होते. पण आम्ही आमचे २० -२० किमी चे टप्पे तासाभरात पार करण्याचा प्रयत्न करत होतो.

दिवस माथ्यावर येत होता आणि आम्ही आमचे ध्येय गाठण्याच्या वेडाने झपाटल्यासारखे किलोमीटर मागून किलोमीटर पार करत आम्ही पुढे पुढे जात होतो. जसे जसे ऊन वाढत गेले आम्ही अंतर कमी करून थोड्या थोड्या वेळाने पानी ब्रेक घेत होतो.

एके ठिकाणी आम्हाला एक बाइक उलट्या दिशेने आमच्याकडे येताणा दिसली त्यावेळी आम्ही असाच एक ब्रेक घेतलेला होता ती दुचाकी आमच्या जवळ आल्यावर कळले की हे  दुचाकीस्वार महाराष्ट्रातील आहेत आम्ही एकमेकांची माहिती घेतली आणि आज आम्ही उशिरा का होईना आम्ही अयोध्येत पोचणारच हे समजल्यावर त्यांनी आम्ही रूम मिळाली तर तुम्हाला सांगतो असे अश्वासन देऊन ते पुढे आयोध्येकडे निघून गेले.

आम्ही अगदीच घाई न करता नियोजनबद्धरीतीने १५-१५ , २० -२० किलोमीटर चे टप्पे पार केले की आम्ही आम्हालाच पुरस्कार स्वरूप दूध किंवा मिळेत ते खाद्य पुरवत पुन्हा सायकलवर स्वार होऊन पुढे जात होतो आज आम्हाला थोडा आराम केल्यावर पुन्हा सायकल वर बसायला अजिबात कंटाळा येत नव्हता आम्ही नवीन रोमांचाने नवीन टप्पा पार करत होतो.

आज आमचे लक्ष केवळ आणि केवळ अंतर पार करण्यावर होते बाकी आम्हाला काही घेणे-देणे नव्हते. साडेचार वाजेपर्यंत आम्ही जवळ जवळ दीडशे किलोमीटर अंतर पार केले होते आणि अजूनही आम्हाला जवळपास ७० किमी पेक्षा जास्त अंतर पार करायचे होते.  थोड्याच वेळात आम्ही वाराणशी – लखनौ हायवे सोडून सुलतानपूर बायपास (पखरोली रोड) ने अयोध्या रोडकडे जाण्यासाठी निघालो. सूर्य आता दूर झाडाच्या आडोश्याला जाऊ ललगा होता. मंद धुक्यात दूरपर्यंत पडणाऱ्या सावल्या आपले अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होत्या. आम्ही छोट्या रोडवरून तुफान सायकली दामटवत होतो अयोध्येत पोचायला खूप उशीर झाला तर राहण्यासाठी सोय करताना समस्या येऊ शकते तेव्हा जेव्हडे लवकर पोचता येईल तेव्हडे लवकर पोचू आणि आता उर्जा राखून ठेवून काय करायचे हा विचार करून आम्ही जोरात सायकली पळवत होतो.

शरीराच्या कोणत्याची कुरकुरिची कसलीही दखल आज घेतली जाणर नव्हती. अनेक किलोमीटर ची शर्यत सामान्य वेगाने धावणाऱ्या धावकांनी शेवटचे काही किलोमीटर जीवाच्या आकांताने धावावे तसे आम्ही पूर्ण जोर लाऊन सायकली चालवत होतो.

अंधार वाढू लागला होता आणि अंतर किलोमीटर मागे किलोमीटरने कमी होत होते आम्ही अयोध्या पन्नास किलोमीटर राहिली आणी आम्ही एका मैलाच्या दगडाजवळ फोटो घेत पाणी ब्रेक घेतला आणि पुढे निघालो. आता रोडवर चांगलीच गर्दी वाढलेली होती आम्ही मात्र आमच्या मार्गाने पुढे निघालो होतो. हळू हळू अंधार वाढत होता आणि आमच्या सायकलच्या लाईट अधिक प्रकाशमय होत होत्या. मैलाच्या दगडावरील आकडा हळू हळू कमी होत होता आणि आमचा उत्साह आणि सोबत धुकेही क्रमक्रमाने वाढत होते.

जवळून जाणाऱ्या कार आणि इतर वाहनातून लोक आमचा उत्साह वाढवत होते.  कुणी हात हालवत, कुणी जय श्री राम च्या घोषणा देत तर कधी आमच्या समांतर चालत आमची चौकशी करत लोक  कौतुकाचे शब्द बोलत आमचा प्रवास सार्थ ठरवत होते.

अयोध्या वीस – पंचवीस किलोमीटर राहिल्यावर आम्ही एके ठिकाणी थांबून दुध पिऊन थोडा आराम केला आणि पुन्हा अयोध्येकडे जाणाऱ्या महापुरावर स्वर होऊन पुढे चालू लागलो. आता दर पाच किलोमीटर नंतर आम्ही थांबून फोटो तसेच पाणी ब्रेक घेत होतो. आज थकलेल्या शरीरावर आयोध्येची ओढ वरचढ होत होती. जसे जसे किलोमीटर कमी होत होते तसा तसा रोमांच, उत्साह, आनंद वाढत होता.

किलोमीटर चा आकडा एकेरी अंकात आल्यावर आम्ही प्रत्येक मैलाच्या दगडाला भेटत होतो शेवटचे तीन किलोमीटर आम्ही भावूक झालो होतो गेले दहा बारा दिवस ज्या एका ध्येयाने आम्ही कठीण ते महाकठीण परिस्थितीत स्वतःला सावरत, हिम्मत न हारता, वेदनेवर दुर्दम्य इच्छाशक्तीने विजय मिळवत मागील २००० किलोमीटर अंतरावर जी आमच्या प्रभूराम भक्तीचा ठसा उमटवत इथपर्यंत आलो होतो ते निश्तितच आमच्यासाठी गौवरवस्पद होते.  

आम्ही एक प्रवास योजना आखली आणि त्यानुसार आम्ही शेवटपर्यंत प्रवास केला कित्येक वेळा अशी परिस्थिती  निर्माण झाली होती कि आमची योजना फसते कि काय प्रवासाच्या तिसऱ्याच दिवशी माझ्या पायाला गोळे आल्याने दुसऱ्या दिवशी मी प्रवास करू शकेल का अशी परिस्थिती निर्माण झाली असतानाही आम्ही पुढील प्रवास मोठ्या धर्याने चालू ठेवला आणि आज त्याचा कळस होत आहे हे जाणून अभिमानाने उर भरून न आल्यास नवलच नाही का?

मनात भावनांचा कल्लोळ चालू असतानाच आम्ही शहरात प्रवेश केला आम्ही ० मैलाचा दगड शोधत होतो पण आम्हाला तो आढळला नाही आम्ही एके ठिकाणी थांबून ठरवले कि श्री राम मंदिर परिसरात रूम पाहू म्हणजे आपल्याला रूम ते मंदिर जास्त अंतर राहणार नाही आणि उद्या तसेच पुढे गोरखपूर कडे जाता येईल. आम्ही नकाशा तसेच स्थानिक लोकांना विचारत पुढे जाऊ लागलो.

हे शेवटचे काही क्षण खऱ्या अर्थाने आमच्यासाठी मंतरलेले होते आमच्या सायकल जीवनातील एक असा टप्पा कि जो पुढे आयुष्यभर नुसता लक्षात राहणार नाही तर तो आम्हाला अभिमानाने मिरवता येईल.

धुक्याची चादर चांगलीच गडद झाली होती रोडवरील दिव्याभोवती धुक्याने चांगलीच गर्दी केली होती अजून एक थर थंडीच्या कपड्यांचा घालावा का अशी परिस्थिती होती पण आता जास्त अंतर राहिले नव्हते तेव्हा थोड्याच वेळात आम्ही हायवे सोडून डावीकाडे वळण घेतले आणि तिथेच रूम पाहायला सुरुवात केली अगदी काही मीटर वरच आम्हाला एक रूम मिळाली हवे तेव्हडे गरम पाणी आणी सायकल ची चांगली सोय पाहून आम्ही तिथेच थांबायचे ठरवले. रूमवर फ्रेश व्हायचे आणि मग मंदिराकडे जाण्याचा आमचा बेत होता. आज आम्ही २२० किमी चे अंतर लीलया पार केले होते आणि याचे आम्हला आमचेच कौतुक आणि नवलही होते. आम्ही फ्रेश होऊन खाली येईपर्यंत दहा वाजून गेले होते दिवसभर आम्ही जेवण घेतले नव्हते तेंव्हा आता भूक हि लागली होती आणि मंदिराकडून परत येईपर्यंत  हॉटेल बंद होणार होते त्यामुळे आम्ही आधी जेवण घेऊन मग सायकलसह मंदिराकडे जाऊ असा विचार करून आम्ही तिथेच असलेल्या हॉटेल मध्ये जेवणासाठी गेलो जेवण होईपर्यंत साडेअकरा होऊन गेले होते.

जेवण झाल्यावर आम्ही सायकल घेऊन मंदिराकडे निघालो  तिथून ३ किमी वर मंदिर होते थोड्याच वेळात आम्ही मंदिराजवळ पोचलो आत जायला परवानगी नव्हती तेव्हा आम्ही गेट वर फोटो काढले. तिथले लोक हि आमची चौकशी करत आमचे तोंडभरून कौतुक करत होते. धुके असल्याने आम्ही पुन्हा सकाळी किवा गोरखपूर कडे जाताना इकडे येऊ असे ठरवून आम्ही रूमकडे परत निघालो आता संपूर्ण अयोध्या नागरी धुक्यात सामावली होती आम्ही धुक्यातून वाट काढत आमच्या रूमवर आलो.

रात्रीचा एक वाजत आला होता तेंव्हा उड्या सकाळी लवकर दर्शनाला जाऊ आणि  दर्शन घेऊन मग शेवटची १०० किमी ची राईड गोरखपूर कडे करू असा आडाखा बांधत कधी समाधानाची झोप लागली ते डोळ्यानाही कळले नाही.

Takniki Duniya

Recent Posts

CET CELL 2025 के तहत NRI/PIO/OCI/CIWGC छात्रों के लिए BE/B.Tech प्रवेश प्रक्रिया पूरी जानकारी

📌 NRI, PIO OCI, CIWGC क्या है CET CELL Admission प्रक्रिया मे? नमस्ते दोस्तों! अब…

2 months ago

चाकांवरचा कुंभ-दिवस तेरावा-श्री राम दर्शन आणि परतीचा प्रवास: Day 13: Shri Ram Darshan & Return Journey

काल रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे आज सकाळी उठायला उशीर झाला होता रात्री कधीतरी आमचे मित्र…

3 months ago

चाकांवरचा कुंभ-दिवस अकरावा-प्रयागराज ते वाराणशी (१२१ किमी): Day 11: Prayagraj to Varanasi Ride

आम्ही जेंव्हापासून हा प्रवास सुरू केला होता आम्ही कधीही पहाटे चार वाजता उठून आवरले नव्हते…

3 months ago

चाकांवरचा कुंभ-दिवस दहावा-बांदा ते प्रयागराज (१७० किमी): Day 10: Banda to Prayagraj Ride

कालच्या थरारक प्रवासानंतर आम्ही आमची योजना स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार बदलून आता पुन्हा ४० किमी मागे…

3 months ago

चाकांवरचा कुंभ-दिवस नववा-बागेश्वर धाम ते बांदा (१३१ किमी): Day 9: Bageshwar Dham to Banda Ride

काल आम्ही अनपेक्षितपने बागेश्वर धाम मध्ये पोचल्याने आम्ही आमची योजना थोडी बदलली आणि आज खजुराहो…

3 months ago

चाकांवरचा कुंभ-दिवस आठवा-झाशी ते बागेश्वर धाम (१६० किमी): Day 8: Jhansi to Bageshwar Dham Ride

आज आम्ही छतरपुर पर्यंत जायचे ठरवले होते. गेल्या दोन दिवसापासून चे वातावरण पाहता आज आम्हाला…

3 months ago

This website uses cookies.