cycle travel documentary Ayodhya
इस पोस्ट में क्या है ?
तसे पहिले तर आम्हाला पुणे ते कन्याकुमारी या लांब पल्ल्याच्या सायकल प्रवासाचा अनुभव असल्याने पुणे ते अयोध्या सायकल वारीसाठी काय काय तयारी करायला पाहिजे याची चांगली जान आम्हाला होती.
खरे तर पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवासानेच पुणे ते अयोध्या सायकल प्रवासाची बीजे पेरली होती. त्यामुळे जून पासूनच आम्ही हळूहळू पुणे ते अयोध्या प्रवासाची तयारी करू लागलो. कन्याकुमारी प्रवासाने आमचा आत्मविश्वास दुणवलेला असल्याने आपण ही राईड सहज पूर्ण करू अशी आम्हाला खात्री होती तरीही आम्ही नोव्हेंबर पासून सायकल चालवायचा सराव वाढवला होता.
नोव्हेंबर – डिसेंबर मध्ये पुण्यातून काही सायकलस्वार अयोध्या वारी करून आले होते त्यांचे अनुभव व जाण्याचा मार्ग निश्चित करण्याचे ठरले. अगोदर १६०० किमी चा नागपूर मार्गे जाण्याचा विचार होता. परंतु नंतर तो मार्ग उज्जैन, झाशी, खजुराहो कडून प्रयागराज, वाराणशी आणि मग अयोध्या असा निश्चित झाला. त्यात ही रेल्वे गोरखपूर वरून असल्याने तो ही मार्ग यात जमा करून एकूण प्रवासाचे अंतर २१०० पर्यन्त वाढत गेले.
पुणे ते कन्याकुमारी या सायकल प्रवासादरम्यान ज्या चुका आमच्याकडून झाल्या होत्या त्या या प्रवासात टाळण्याचा निर्धार आम्ही केला होता. जसे की मागील प्रवासादरम्यान आम्ही आवश्यकते पेक्षा जास्त समान सायकल वर लादले होते. या वेळी आम्ही ते अगदी कमी करून एका छोट्या बॅग मध्ये बसेल एव्हडेच सामान सोबत घ्यायचे ठरले होते.
पुणे ते अयोध्या या वारीसाठी प्रायोजक मिळविण्यासाठी मी हातपाय मारायचे ठरवले होते. अनेक ठिकाणी विचारणा करून झाली होती. पन कुठे डाळ शिजेल असे दिसेना.
आम्ही बऱ्याच वेळा मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सायकल रॅली मध्ये सहभागी झालो होतो तेंव्हा त्याचे सायकलस्वारांबद्दलचे प्रेम आम्हाला माहीत होते तेंव्हा आम्ही त्यांच्या विविध कार्यक्रमाचे (सायकल रॅली) यांचे नियोजन करणाऱ्या डॉ. अनुराधा एडके ताई व श्री राज तांबोळी यांना भेटून शब्द टाकायचे ठरले त्याप्रमाणे आम्ही डॉ. अनुराधा एडके ताई यांना विनंती केली त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला परंतू मधल्या काळात आमच्याकडून आढावा घ्यायचे राहून गेले आणि आम्ही स्वतयारीला लागलो. राईड ला निघायचे काही दिवस बाकी असताना ताईंचा आम्हाला फोन आला की तुम्ही भेटायल या विसरलात की काय? आणि आमच्या संपूर्ण प्रवासाची जबाबदारी दादांनी घेतल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. खरे तर नेते मंडळींचा शब्द म्हणजे फक्त देण्यापुरता असतो तो काही पळायचा नसतो अशी धारणा करून आम्ही हा विषय सोडून दिला होता. पण जेव्हा ताईंचा आम्हाला फोन आला आणि त्यांनी स्वतः या बाबतीत पुढाकार घेऊन आम्हाला प्रयोजकत्व बहाल केले गेल्याचे सांगितले तेंव्हा खरे तर आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. त्याचबरोबर काही नेते कितीही व्यस्त आणि व्यापात असले तरीही छोट्या गोष्टीबाबत ही दिलेला शब्द पाळायला विसरत नाहीत याची प्रचिती आम्हाला आली.
या मोहिमेचा आर्थिक भार मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी उचलल्याने आम्हाला एक नवी ऊर्जा मिळाली आता फक्त आम्हाला शारीरिक आणि मानसिक तयारीवर भर द्यायचा होता. वेळोवेळी अनुराधा ताईंनी आमच्या तयारीचा आढावा घेतला. आम्ही मोठ्या प्रवासासाठी त्या प्रवासाला समर्पित अशी जर्सी घेत असतो त्यास अनुसरून अनुराधा ताईंनी जर्सी चे डिझाईन फायनल केले व जर्सी तयार झाल्यावर एक दिवस त्यांनी आम्हाला सांगितले की दादा जर्सी चे अनावरण करणार आहेत आज त्यांना भेटायला या एकामागून एक सुखद धक्के आम्हाला बसत होते. दादांनी त्यांच्या हस्ते पुणे ते अयोध्या सायकल वारी च्या जर्सी चे अनावरण अतिशय व्यस्त कार्यक्रम असतानाही केले. त्यानंतर ही त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला निरोप देण्यासाठीही आले हे सर्व पाहून आमचा राजकीय व्यक्तिमत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोण पार बदलून गेला.
जसजसी निघायची तारीख जवळ येत होती तयारीला ही वेग आला होता कोणते सामान घ्यायचे कोणते नाही याचा ऊहापोह करत आम्ही यादी कमीत कमी करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु कितीही सामान कमी केले तरीही एका बॅगेत बसेल एव्हडे सामान कमी करणे आम्हाला काही जमले नाही. शेवटी कन्याकुमारी प्रवासात घेतलेल्या पॅनियर बॅगा सोबत घ्यायचे ठरले आणि सोबत घ्यायचे सामान कमी तर नाही परंतु किंचित जास्तच झाले होते कारण मध्य आणि उत्तर प्रदेश मधील थंडीचा विचार करता रोड बाइक ची टूर बाइककेव्हाच झाली होती.
या प्रवासाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आमच्या सायकली त्यांची स्थिति उत्तम ठेवणे क्रमप्राप्त होते. पुणे ते कन्याकुमारी प्रवासादरम्यान आमच्या सायकल ने एक एक वेळ पंचर होण्याशिवाय कसलाही त्रास दिला नव्हता तरीही त्यांची योग्य डागडुजी करणे क्रमप्राप्त होते. तेव्हा आम्ही दोन्ही सायकलची सर्विस करून घेतली तसेच नवीन टायर व ट्यूब ने सज्ज केली.
तरीही नेमके निघायच्या आदल्या दिवशी माझ्या अचानक लक्षात आले की आत्ताच बादलेले गियर कॅसेट थोडे हालत (शेक होत) आहे. लगेच बाणेर येथील D Byk Store मधून ते फिक्स करून घेतले तेही निघायच्या आदल्या दिवशी. आम्ही पुणे – कन्याकुमारी प्रवासावेळी निरंजन आर्ट, धायरी यांच्याकडून जर्सी बनवून घेतली होती त्यांचेकडूनच पुणे ते आयोध्या वारीची जर्सी बनवून घेतली ज्याचे डिजाइन आमचे मित्र श्री सुयोग शहा यांनी केले होते.
सोबत घेतलेल्या सामानाची यादी | |||
१. | शॉर्ट्स – २ | २४. | हेल्मेट |
२. | जर्सी – २ | २५. | नेलकटर |
३. | टीशर्ट – २ | २६. | स्वेटर |
४. | पॅन्ट – फिरणे साठी – १ | २७. | कॅमेरा स्टिक |
५. | नाइट पॅन्ट शर्ट – १ | २८. | ब्रश व पेस्ट |
६. | केबल्स | २९. | दोरी |
७. | फ्लेक्स | ३०. | सायकल लॉक |
८. | सेलफोन | ३१. | कॅमेरा |
९. | पंचर किट | ३२. | पॉवर बँक |
१०. | ज्यादा ट्यूब -२ | ३३. | कॅश |
११. | सायकल लाइट | ३४. | गॉगल्स |
१२. | स्टिकर बॅंडेज | ३५. | सुक्का मेवा |
१३. | सन क्रिम लोकशन | ३६. | चार्जेर – मोबाईल , बॅटरी |
१४. | औषधे | ३७. | हेडफोन |
१५. | मसाज ऑइल | ३८. | रेडियम रिफ्लेक्टर |
१६. | मॉइश्चराइसर | ३९. | फलक |
१७. | टॉवेल | ४०. | बॅग |
१८. | अंडरवेअर | ४१. | फ्लॅग, बॅनर |
१९. | रुमाल | ४२. | पाणी बॉटल्स |
२०. | शूज-सॉक्स | ४३. | डेटा बॅकअप-साधने |
२१. | ग्लोज | ४४. | चैन (एक्स्ट्रा) |
२२. | मास्क | ४५. | पॉवर एक्स्टेंशन |
२३. | लेग स्लिव्हस | ४६ | हायड्रेशन |
काल रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे आज सकाळी उठायला उशीर झाला होता रात्री कधीतरी आमचे मित्र…
आजचा दिवस खऱ्या अर्थाने आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस होता आजच्या एका दिवसात आम्हाला २२० किमी अंतर…
आम्ही जेंव्हापासून हा प्रवास सुरू केला होता आम्ही कधीही पहाटे चार वाजता उठून आवरले नव्हते…
कालच्या थरारक प्रवासानंतर आम्ही आमची योजना स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार बदलून आता पुन्हा ४० किमी मागे…
काल आम्ही अनपेक्षितपने बागेश्वर धाम मध्ये पोचल्याने आम्ही आमची योजना थोडी बदलली आणि आज खजुराहो…
आज आम्ही छतरपुर पर्यंत जायचे ठरवले होते. गेल्या दोन दिवसापासून चे वातावरण पाहता आज आम्हाला…
This website uses cookies.