चाकांवरचा कुंभ

चाकांवरचा कुंभ – माझे मनोगत : Pune to Ayodhya Cycle Ride

पुणे ते अयोध्या सायकल प्रवास करणारा मी कुणी एकमेव नाही याची पूर्ण जाणीव मला आहे, परंतु असा सायकल प्रवास करणाऱ्यापैकी मी ही एक आहे, ही बाब माझ्यासाठी नक्कीच अभिमानास्पद तर आहेच परंतु या पूर्ण प्रवासात आलेले अनुभव, भेटलेली माणसे, पालथा घातलेला परिसर, एक रोमहर्षक अनुभूती शब्दबद्ध करून केवळ वाचनप्रेमीच नाही तर लांब पल्ल्याच्या सायकल मोहिमा करू इच्छिणाऱ्या सायकलपटूंसाठी देखील प्रेरणादाई तसेच मार्गदर्शनपर ठरेल यात शंका नाही आणि म्हणून हा शब्दप्रपंच!

मागील वर्षी पुणे ते कन्याकुमारी असा १८०० पेक्षा जास्त किमी चा सायकल प्रवास केल्यानंतर कन्याकुमारीच्या सागरकिनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने आम्ही पुणे ते अयोध्या सायकल वारी ची पेरणी केली होती. श्री राम प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त साधत ही सायकल मोहीम पार पडायचे ठरले आणि त्याची पूर्तता ही आम्ही केली.

एक मोठी मोहीम यशस्वीरित्या पार पाडलेली असल्याने आता २००० पेक्षा जास्त अंतर आपण योग्य नियोजन केले तर आपण सहज पार करू शकू याचा आत्मविश्वास आम्हाला असल्याने आम्ही पुणे ते आयोध्या असे सरळ १५०० किमी जाण्यापेक्षा उज्जैन, झाशी, प्रयागराज, वाराणशी, आयोध्या असा २००० पेक्षा जास्त किलोमीटर चा प्रवास ठरवला.

या संपूर्ण प्रवासात आम्हाला वेगवेगळे प्रदेश, माणसे, परिसर अनुभवायला मिळाले. एकदम बदलणारे वातावरण व त्याच्याशी जुळवून घेऊन हा सायकल प्रवास पूर्ण करण्याच्या विलक्षण अनुभव पुस्तकरूपी उतरवून तो शब्दरूपी उपलब्ध करून द्यावा अश्या विचारांनी या पुस्तकाचा पाया घातला. 

आमच्या या पूर्ण मोहिमेचा आर्थिक भार उचलून आम्हाला भक्कम पाठिंबा देणारे आमचे लाडके आमदार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील याचे कोटी कोटी आभार! त्याचे पदाधिकारी डॉ. अनुराधा एडके व श्री. राज तांबोळी सर यांनी या मोहिमेची आखणी ते परत पुण्यात येईपर्यंत केलेले उत्कृष्ट नियोजन व पूर्ण प्रवासादरम्यान दिलेला पाठिंबा या साठी मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

हे शब्दपुष्प गुंफायला श्री सुयोग शहा व त्यांचे कुटुंबीय, माझे कुटुंबीय व मित्रपरिवार, सायकलस्वार परिवार व जाणत्या अजाणत्या स्वरुपात या शब्दसफारीसाठी मदत लाभली आहे त्या सर्वांचा मी मनस्वी आभारी आहे!

           – नारायण पवार

पुणे ते आयोध्या सायकल वारीच्या प्रवासाचा नकाशा

Takniki Duniya

Recent Posts

चाकांवरचा कुंभ-दिवस तेरावा-श्री राम दर्शन आणि परतीचा प्रवास: Day 13: Shri Ram Darshan & Return Journey

काल रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे आज सकाळी उठायला उशीर झाला होता रात्री कधीतरी आमचे मित्र…

3 hours ago

चाकांवरचा कुंभ-दिवस बारावा-वाराणशी ते अयोध्या (२२० किमी): Day 12: Varanasi to Ayodhya Ride

आजचा दिवस खऱ्या अर्थाने आमच्यासाठी ऐतिहासिक दिवस होता आजच्या एका दिवसात आम्हाला २२० किमी अंतर…

3 hours ago

चाकांवरचा कुंभ-दिवस अकरावा-प्रयागराज ते वाराणशी (१२१ किमी): Day 11: Prayagraj to Varanasi Ride

आम्ही जेंव्हापासून हा प्रवास सुरू केला होता आम्ही कधीही पहाटे चार वाजता उठून आवरले नव्हते…

4 hours ago

चाकांवरचा कुंभ-दिवस दहावा-बांदा ते प्रयागराज (१७० किमी): Day 10: Banda to Prayagraj Ride

कालच्या थरारक प्रवासानंतर आम्ही आमची योजना स्थानिक लोकांच्या सांगण्यानुसार बदलून आता पुन्हा ४० किमी मागे…

4 hours ago

चाकांवरचा कुंभ-दिवस नववा-बागेश्वर धाम ते बांदा (१३१ किमी): Day 9: Bageshwar Dham to Banda Ride

काल आम्ही अनपेक्षितपने बागेश्वर धाम मध्ये पोचल्याने आम्ही आमची योजना थोडी बदलली आणि आज खजुराहो…

4 hours ago

चाकांवरचा कुंभ-दिवस आठवा-झाशी ते बागेश्वर धाम (१६० किमी): Day 8: Jhansi to Bageshwar Dham Ride

आज आम्ही छतरपुर पर्यंत जायचे ठरवले होते. गेल्या दोन दिवसापासून चे वातावरण पाहता आज आम्हाला…

5 hours ago

This website uses cookies.